जामनेर – आज जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रयत्नातून आणि मा. नगराध्यक्ष सौ. साधनाताई महाजन यांच्या माध्यमातून नगरात दोन महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
बीप मार्केट परिसरातील ₹७५ लाखांच्या खर्चाने होणाऱ्या नव्या कामाचा तसेच नसीर मिस्त्री यांच्या घराजवळील ₹५० लाखांच्या खर्चाच्या कंपाउंड वॉल बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे.
या कामांमुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत. नगरातील विकासाच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.
नगरातील नागरिकांनी या उपक्रमाबद्दल जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन व नगराध्यक्ष सौ. साधनाताई महाजन यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.





