भुसावळ – भुसावळसह उत्तर भारताकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी आणि तिकिटांच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), मुंबई ते छपरा (Chhapra) दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने या विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
-
गाडी क्र. ०५५८८ — ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १.४५ वाजता छपरा येथे पोहोचेल.
-
गाडी क्र. ०५५८७ — ७ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४५ वाजता छपरा येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
-
गाडी क्र. ०५५९० — १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १.४५ वाजता छपरा येथे पोहोचेल.
-
गाडी क्र. ०५५८९ — ८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.४५ वाजता छपरा येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी दुपारी १.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या सर्व विशेष रेल्वेगाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई (झाशी), उरई, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाहनगर, गोमतीनगर, बाराबंकी, गोंडा, बस्ती, गोरखपूर, देवरिया सदर आणि सिवान या प्रमुख स्थानकांवर थांबे असणार आहेत.
या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची मोठी सुविधा मिळणार आहे.





