झारखंड –झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील सरैयाहाट पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. १७ वर्षीय एका तरुणीचा मृतदेह जंगलात आढळला असून, तिचं शीर झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी २७ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती आणि तिच्या कुटुंबाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलीस आणि कुटुंबीय तिच्या शोधात होते, परंतु त्याआधीच तिचा मृतदेह जंगलात सापडला. मृत तरुणीचे शीर झाडाला लटकलेले आणि शरीराचा अर्धा भाग जंगलातून सापडला आहे, ज्यामुळे या घटनेने संपूर्ण परिसराला हादरवून टाकले आहे.
अल्पवयीन मुलीच्या हत्येचे कारण प्रेमप्रकरण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे एका तरुणासोबत रिलेशनशिप होते, आणि प्रेमप्रकरणातून तिच्या हत्येची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. सध्या अधिक तपास चालू आहे आणि आरोपीला तात्काळ अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.





