यावल – येथील पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नाकाबंदी करण्यासाठी उपयोगी पडणारे बॅरिकेड्स प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे जनजागृतीसाठी या बॅरिकेड्सवर दारू पिऊन वाहने चालवू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, त्याचप्रमाणे विविध संदेश देण्यात आले आहेत.
डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यात सदर बॅरिकेड्स वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलिस कर्मचारी अर्शद गवळी, दिवाकर जोशी यांनी यावल पोलिस ठाण्याच्या आवारात उतरवले आहेत. नव्याने हे एकूण १३ रोड बॅरिकेड्स प्राप्त झाले आहेत. या बॅरिकेड्सचा उपयोग नाकाबंदी त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रशासकीय इमारतीत मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी व इतर कामाकरिता उपयोग केला जाणार आहे.
भारतातील सर्वात मोठी मायक्रो फायनान्स संस्था असून संस्थेचे प्रमुख कार्यक्रम सामाजिक कार्य दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक व अंगणवाडी शाळा गोरमेंट हॉस्पिटल व कॉलरशिप अशी अनेक ठिकाणी सामाजिक कार्य केले आहे तीच परंपरा कायम ठेवून यावल पोलीस स्टेशन या ठिकाणी 13 बॅरिगेट दिले यावेळी सावदा एरियाचे एरिया मॅनेजर राजु डी बी पाटील यांनी कंपनी बद्दल सविस्तर चर्चा पी आय साहेबांसोबत केली कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित यावल पोलीस स्टेशनचे पीआय रंगनाथ धारबळे साहेब व इतर सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते व तसेच क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण लिमिटेडचे एरिया मॅनेजर राजू डी बी पाटील व यावल शाखेचे शाकाधिकारी कैलास पाटील,इम्रान शहा,अनंता गणेश, केंद्र मॅनेजर किरण इंगळे उपस्थित होते





