यावल – यावल शहरातील विस्तारित भागातील दोन नंबर प्रभागामधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली. तडवी समाज, पटेल समाज आणि परिसरातील असंख्य तरुणांनी शिवसेनेवर विश्वास दाखवत जिल्हा शिवसेना प्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला.
या वेळी शिवसेना जिल्हा उपसंघटक नितीन सोनार, तालुकाप्रमुख राजाभाऊ काठोके, शहर प्रमुख पंकज बारी, युवासेना तालुकाप्रमुख अजय तायडे, फैजपूर शहर प्रमुख पिंटू मंदवाडे, तसेच महिला शहर प्रमुख स्वाती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये अॅड. सलमान पटेल, अल्ताफ पटेल, रफिक पटेल, शाहरुख खान, कपिल खान, आरिफ पटेल, आरिफ शरीफ पटेल, जमील पटेल, मुस्ताक पटेल, तोहीद पटेल, इमरान पटेल, आवेश पटेल, शरीफ पटेल, अजहर पटेल, साहिल पटेल, अक्रम पटेल, अबरार पटेल यांच्यासह शंभरावर तरुणांचा समावेश आहे.
या सर्वांचा स्वागत व सत्कार समाधान महाजन यांच्या हस्ते धनुष्यबाण चिन्ह असलेले टॉवेल गळ्यात घालून करण्यात आला. प्रवेश सोहळ्यामुळे यावल शहरातील शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.





