• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का! राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 11, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का! राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये
बातमी शेअर करा !

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक जगदाळे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

जगदाळे यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अशोक जगदाळे आणि त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

अशोक जगदाळे यांच्यासोबत नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरिफभाई शेख, माजी नगरसेवक अमृत भाऊ पुदाले, माजी नगरसेविका सुमनताई जाधव, तसेच संजय बेडगे, ताजोद्दीन सय्यद, रुक्नोदीन शेख, आलीम शेख, दत्ता राठोड, अमोल सुरवसे, नवलकुमार जाधव आणि माजी नगराध्यक्षा रेखाताई वसंत बागल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,

“काँग्रेस हा सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेसचा विचार देशाला तारणारा आहे. राहुल गांधी यांच्या संघर्षावरचा विश्वास पुन्हा दृढ होत असून, राज्यात काँग्रेसचे चांगले दिवस परत येतील,” असे ते म्हणाले.

बातमी शेअर करा !
Next Post
महापालिकेच्या नावाने पाणी बिल अपडेटचा बनावट मेसेज; तीन जणांची लाखोंची फसवणूक

महापालिकेच्या नावाने पाणी बिल अपडेटचा बनावट मेसेज; तीन जणांची लाखोंची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News