पाल (ता. रावेर) – शाळेजवळ १० फूट लांब अजगर दिसून आला. गेल्या दहा दिवसांपासून या अजगराचे परिसरात वास्तव्य होते. त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली. या परिसरात अजगराचा शोध घेऊन जीवदान देण्यात आले.
त्याला वनरक्षक शांतीनाथ बनगे,
वनरक्षक मुकेश तडवी, वनमजूर सबाज तडवी, हुसेन तडवी, मुस्तफा तडवी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बारेला, सर्पमित्र शेख आवेश, सत्तार शेख, सोहेल शेख (रा. रसलपूर) यांनी अजगराला पकडले. या अजगराचे वजन २२ किलो होते. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.





