विवरे ता. रावेर – तालुक्यातील विवरे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात दि 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता थोर क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिलेमा सरपंच इनुस तडवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच इनुस तडवी, उपसरपंच विनोद मोरे, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव नरवाडे, युसुफ खाटीक, मनिषा पाचपांडे, पुनम बोडे, निलीमा सनंसे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी मजीत तडवी, किशोर पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





