रावेर – जळगाव जिल्ह्यातील यावल येथे पार पडलेल्या ३९ वी जळगाव जिल्हा शूटिंग बॉल विजेतेपद व निवड चाचणी २०२४-२५ मध्ये अँग्लो उर्दू हायस्कूल, रावेर येथील पाच विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे
१) शेख मोहम्मद हमजा अझहरुद्दीन
२) झैद खान अकरम खान
३) मोहम्मद औसाफ एजाजुद्दीन
४)सय्यद हाशीर सय्यद रजा हुसैन
५) शेख फ़ैज़ शेख फ़रीद
या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय सामन्यांत उत्कृष्ट खेळकौशल्य, वेग आणि टीमवर्क दाखवून पंच व प्रेक्षकांची दाद मिळवली.
संस्थेचे चेअरमन यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संग व्यवस्थापक सय्यद नूर सर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व शिस्तीचे कौतुक करून त्यांना प्रेरणा दिली.
तसेच संग परिशिक्षक रेहान सर यांनी खेळाडूंच्या सराव, तयारी आणि संघभावनेची प्रशंसा करत राज्यस्तरावरही उत्कृष्ट यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.
शाळेच्या संपूर्ण स्टाफनेही हार्दिक अभिनंदन देत विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाचा आनंद व्यक्त केला.





