• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांनी ‘आंबापाणी’ येथे साजरा केला ‘जनजातीय गौरव दिन’

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 22, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांनी ‘आंबापाणी’ येथे साजरा केला ‘जनजातीय गौरव दिन’
बातमी शेअर करा !

यावल –15 नोव्हेंबर म्हणजे स्वातंत्र्य संग्रामात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आदिवासी जमातीच्या जननायक बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस. हा दिवस भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृति प्रित्यर्थ भारतभर ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून माननीय श्री. एम .क्यू .एस. एम. शेख अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांच्या निर्देशानुसार व नेतृत्वाखाली दि. 16 नोव्हेंबर रोजी यावल तालुका विधी सेवा समितीने तालुक्यातील वाघझिरा या गावाजवळ अति दुर्गम भागात वसलेल्या ‘आंबापाणी’ या गावी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री पवनजी बनसोड यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांचे आदिवासी नृत्यद्वारे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पारंपारिक वेशभूषा परिधान करून आदिवासी बंधू-भगिनींनी आपले पारंपारिक नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय पवनजी बनसोड यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या. त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष संपूर्ण आदिवासी वस्तीचे निरीक्षण केले आदिवासी बांधवांशी चर्चा केल्या. यावेळी आदिवासी बांधवांनी ही आपल्या समस्यांची सोडवणूक व्हावी या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला निवेदन सादर केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन यावल तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यावल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवनजी बनसोड यांनी उपस्थित आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय श्री. आर. एस. जगताप यांनी उपस्थितांना कायदेविषयक अनमोल मार्गदर्शन केले.
यावल वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. जी. कवडीवाले यांनी आदिवासी बांधवांना वनअधिकार कायदा (FRA) संदर्भात मार्गदर्शन केले. अ‍ॅड. अतुल भास्कर यांनी उपस्थितांना कायद्याची ओळख करून दिली. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी श्री. किशोर सपकाळे साहेब यांनी पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समांतर विधी सहाय्यक श्री. शशिकांत वारूळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अ‍ॅड. याकूब तडवी यांनी मानले.
या प्रसंगी पंचायत समितीचे श्री. किशोर सपकाळे (विस्तार अधिकारी ग्रामपंचायत), एपीआय अजयकुमार वाढवे, यावल वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. जी. कवडीवाले, आरएफओ बी. के. थोरात, राऊंड ऑफिसर विपुल पाटील, पत्रकार बंधू तसेच प्राधिकरणाचे वरिष्ठ लिपिक प्रमोद ठाकरे, संतोष तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला अ‍ॅड. के. डी. सोनवणे, अ‍ॅड. रियाज पटेल, अ‍ॅड. याकूब तडवी, अ‍ॅड. भूषण महाजन, अ‍ॅड. शेखर तडवी, अ‍ॅड. अतुल भास्कर, ॲड नितीन कोळी,वनविभागाचे चेतन शेलार, अशोक राठोड, विपुल पाटील आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारसिंग बारेला (अध्यक्ष JFM), दिला पाटील, हुकाऱ्या बारेला, जंगलू महाराज, डेब्या जिऱ्या, इदा पुट्ट्या, अशोक राठोड, यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजिव तडवी, न्यायालयीन कर्मचारी आकाश पाटील, राजू तडवी (बेलीफ), अविनाश पोफळे, राहुल चव्हाण, समांतर विधी सहाय्यक हेमंत फेगडे, अजय बढे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Next Post
विवरे परिसरात रस्त्यांदरम्यान झाडे झुडपे वाढले, अपघाता ची शव्यता

विवरे परिसरात रस्त्यांदरम्यान झाडे झुडपे वाढले, अपघाता ची शव्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News