• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, November 30, 2025
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

चिमुकल्या ‘यज्ञा’ वर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशीचीच शिक्षा व्हावी!

पहूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह संतप्त ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षकांना दिले निवेदन

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 22, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
चिमुकल्या ‘यज्ञा’ वर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशीचीच शिक्षा व्हावी!
बातमी शेअर करा !

पहूर (ता. जामनेर) – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम विजय संजय खैरनार याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या एकमुखी मागणीसाठी आज, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी पहूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी संतप्त आवाज उठवला. मूक मोर्चाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी यज्ञाच्या आत्म्यास न्याय मिळवण्यासाठी ठाम भूमिका घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज चौक–दादासाहेब कॅप्टन एम.आर. लेले पहूर बसस्थानक येथून मोर्चाची सुरुवात झाली.
आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि आर.बी.आर. माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी हातात निषेध फलक घेऊन निर्धाराने पोलिस ठाण्याकडे मार्गस्थ झाले.

पोलिस ठाण्याच्या आवारात विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांना आरोपीस तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी असलेले तीव्र निवेदन सादर केले.

या वेळी संपूर्ण पहूर संतप्त भावनेने पेटून उठले होते.
माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे, उपसरपंच राजू जाधव, आर.बी.आर. कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन, सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कल्पना बनकर, हरिभाऊ राऊत, शंकर भामेरे यांनी जाहीरपणे संताप व्यक्त करत म्हणाले –
“अशा राक्षसी कृत्याला समाजात जागा नाही. यज्ञाच्या हत्यारे नराधमास तात्काळ फाशी झालीच पाहिजे!”

याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पर्यवेक्षक मधुकर आगारे, माजी सरपंच शंकर जाधव, सदस्य विक्रम घोंगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अर्जुन लहासे, सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गिरीश भामेरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र लाठे, शिक्षिका विद्यादेवी भालेराव, सुनिता पाटील, माधुरी बारी, सरोजिनी वानखेडे, डी. वाय. गोरे, बी. एन. जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पहूरकर संतापून उपस्थित होते.

गावातील नागरिक, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनावर आरोपीविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याचा दबाव वाढला आहे.
यज्ञासाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शब्दाला मान देत माझी प्रभाग क्रमांक ६ मधून माघारी..अपक्ष उमेदवार सैय्यद मजहर सय्यद जहांगीर यांची स्पष्टोक्ती

आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या शब्दाला मान देत माझी प्रभाग क्रमांक ६ मधून माघारी..अपक्ष उमेदवार सैय्यद मजहर सय्यद जहांगीर यांची स्पष्टोक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

November 29, 2025
बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

November 29, 2025
घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

November 29, 2025
दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

November 29, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News