• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, December 1, 2025
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यात माघारीचा धडाका; अंतिम लढत रंगतदार

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 22, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यात माघारीचा धडाका; अंतिम लढत रंगतदार
बातमी शेअर करा !

जळगाव – जिल्ह्यातील 16 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये माघारीच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील निवडणूक लढतींचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगरसेवकपदासाठी तब्बल ५८२ आणि नगराध्यक्षपदासाठी ५४ उमेदवारांनी माघार घेतल्याने स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे. आता नगरसेवकपदासाठी १५५५, तर नगराध्यक्षपदासाठी ७७ उमेदवार मैदानात उरले आहेत.

भुसावळ–वरणगावमध्ये आठ-आठ उमेदवार; चुरस तीव्र

भुसावळ आणि वरणगाव येथे नगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी आठ उमेदवार रिंगणात असल्याने या दोन्ही ठिकाणी तुफानी लढतीची चिन्हे स्पष्ट आहेत.
दुसरीकडे मुक्ताईनगर आणि पाचोरा येथे सरळ लढत असल्याने मतदारांचे लक्ष या दोन पालिकांकडे केंद्रीत झाले आहे.

२४६ प्रभाग, ४६४ जागांसाठी निवडणूक भुसावळ ‘अ’ वर्ग, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा ‘ब’ वर्ग, तर यावल, नशिराबाद, वरणगाव, पारोळा, भडगाव, धरणगाव, सावदा, रावेर, एरंडोल आणि फैजपूर या ‘क’ वर्ग नगरपरिषद म्हणून ओळखल्या जातात.
शेंदूर्णी आणि मुक्ताईनगर या नगरपंचायतींसह जिल्ह्यात एकूण २४६ प्रभागांतून ४६४ नगरसेवक पदांसाठी निवडणुका होत आहेत.

धरणगावात १०० उमेदवारांची माघार माघारीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत समन्वयाची लगबग सुरू होती. शेवटच्या दिवशी धरणगाव येथे तब्बल १०० उमेदवारांनी माघार घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले.

भुसावळमध्ये २५५ उमेदवार; जामनेरमध्ये नगराध्यक्ष बिनविरोध भुसावळ येथे माघारीनंतर सर्वाधिक २५५ उमेदवार रिंगणात राहिल्याने तेथील स्पर्धा अधिक तापणार आहे.
विशेष म्हणजे जामनेरमध्ये नगराध्यक्षपदासाठीच्या चारपैकी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली आहे.

प्रचारासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिवसभर उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्षनेत्यांच्या हालचालींनी जिल्ह्यात राजकीय तापमान चढले होते. निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी २६ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.
प्रचारासाठी ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत, तर सभा-मोर्चांसाठी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी असेल.

दोन डिसेंबरला मतदान, तीनला निकाल जिल्ह्यातील ८ लाख ८९ हजार ९१४ मतदार २ डिसेंबर रोजी ९७७ मतदान केंद्रांवर मतदान करतील. मतदानाची मोजणी आणि निकाल ३ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून या निकालावरून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य निश्चित होणार आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
निवडणुकीत दडपशाहीचे आरोप; रोहित पवारांचा गिरीश महाजनांवर जोरदार निशाणा

निवडणुकीत दडपशाहीचे आरोप; रोहित पवारांचा गिरीश महाजनांवर जोरदार निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

शेडनेट मंजुरीच्या आमिषाने शेतकऱ्याची ७ लाखांची फसवणूक; अमळनेर तालुक्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा

November 29, 2025
बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

बिअर बॉटलचा कंटेनर उलटला; चालक अडकलेला असताना जमावाने लूट केली

November 29, 2025
घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

घाटकोपरमध्ये वृद्ध महिलेची हत्या; सावत्र सुनेला अटक

November 29, 2025
दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

दूध देण्यासाठी जात असताना दुचाकीची धडक; ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

November 29, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News