रावेर – मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये सहामाही परीक्षा निकाल व नंतरची पालक सभा उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी सौ के एस ए अग्रवाल गर्ल्स हायस्कूलचे प्रा पंकज पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका या विषयावर उत्कृष्ट भाषण केले. या पालकसभेत जवळपास ३०० पेक्षा जास्त पालक उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष स्थानी दिलीप वैद्य सर होते तर कार्यक्रमाची प्रास्ताविका _ अकोले मॅडम मांडले व
सूत्र संचालक _ भारती जिरी मॅडम यांनी केले. अध्यक्ष सरानी आपल्या विचारातून पालकांनी आपल्या मुलांचा प्रगतीचे सविस्तर माहिती ,अडचण याबाबत संप्रेषण घडून आणने किती महत्वाचे आहे. याबाबत मार्गदर्शन केले. ही सभा यशस्वी होण्यासाठी आणि पालकांच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीसाठी सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून परिश्रम घेतले आणि आभार प्रदर्शन _ सुनीता महाजन मॅडम केले.





