दुबई – एअर शोच्या शेवटच्या दिवशी भारत निर्मित तेजस MK-1 लढाऊ विमान कोसळल्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली. हवाई कसरतीदरम्यान अचानक विमानाने अनियंत्रित घिरट्या घेतल्या आणि क्षणात जमिनीवर कोसळून भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेमागे तांत्रिक बिघाड की घातपात? याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे.
भारतीय हवाई दलाकडे सध्या 141 तेजस MK-1 विमाने आहेत. स्वदेशी बनावटीच्या या लढाऊ विमानामुळे भारताच्या ‘आत्मनिर्भरते’चे जगभर कौतुक होत असताना ही दुर्घटना मोठा धक्का मानली जात आहे.तेजस MK-1 विमानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये
आत्मनिर्भर भारताचे प्रतीक असलेले स्वदेशी हलके मल्टीरोल लढाऊ विमान
हवेतून-हवेत आणि हवेतून-जमिनीवर लक्ष्य भेदण्याची क्षमता
वेग : 2,222 किमी प्रतितास
उड्डाण क्षमता : 50,000 फूट
डेल्टा विंग डिझाइन – उच्च गती आणि चपळता मिळवून देणारे
क्वाड्रुप्लेक्स डिजिटल फ्लाइट कंट्रोल सिस्टम – विमानाला हवेत स्थिर ठेवणारी प्रगत यंत्रणा
शत्रूच्या रडार प्रणालीला जॅम करण्याची क्षमता
हवेतच इंधन भरण्याची सोय
रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज
तेजसची रचना आणि तांत्रिक क्षमता अत्यंत मजबूत मानली जात असताना हे विमान अचानक कोसळल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे ब्लॅक बॉक्स, कॉकपीट डेटा रेकॉर्डर, तसेच विमानाच्या अवशेषांचे विश्लेषण करून तांत्रिक बिघाड, मानवी त्रुटी की घातपात—यातील कोणते कारण जबाबदार आहे, याचा सखोल तपास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





