मालेगाव – तालुक्यातील डोंगराळे गावात एका निरागस बालिकेवर झालेल्या भीषण अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आज पहुर पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
हे निवेदन समस्त मुस्लिम समाज तसेच तरुण मित्र मंडळ, पहुर यांच्या वतीने सादर करण्यात आले. या वेळी सरफोद्दिन शेख, आफ्ताब पठाण, अनिस शेख, अमर तडवी, अब्दुला शेख, अल्ताफ शेख, आसिफ तडवी, अझर शेख, रहिम पठाण यांसह अनेक समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजातील सर्व घटकांनी या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, पीडितेला न्याय मिळावा यासाठी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली.





