• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, January 15, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

चऱ्होलीतील व्यावसायिक हत्याकांडाला धक्कादायक वळण; माजी नगरसेवक किसन तापकीर यांचं नाव सूत्रधार म्हणून समोर

vyaghra shuryam by vyaghra shuryam
November 27, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
चऱ्होलीतील व्यावसायिक हत्याकांडाला धक्कादायक वळण; माजी नगरसेवक किसन तापकीर यांचं नाव सूत्रधार म्हणून समोर
बातमी शेअर करा !

पुणे – चऱ्होलीतील वडमुखवाडी परिसरात व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्या गोळ्या झाडून झालेल्या खुनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या खुनाचा सूत्रधार म्हणून माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर यांचे नाव पुढे आले असून, दिघी पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. तापकीर यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नेमका कसा होता, हे तपासात उघड होणार असले तरी त्यांच्या नावामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी अमित जीवन पठारे (वय ३५), विक्रांत सुरेश ठाकूर, आणि सुमीत फुलचंद पटेल (वय ३१) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

घटना कशी घडली? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अलंकापुरम रस्त्यावर गिलबिले आपल्या परिचितांसोबत थांबले होते. त्याचवेळी आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्युनर कारने येऊन गिलबिले यांना कारमध्ये बसवतात आणि त्यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडतात. गिलबिले यांचा घटनास्थळीच मृत्यू होतो आणि आरोपी तेथून पसार होतात.

आरोपींची पोलिसांकडून धरपकड तपासादरम्यान आरोपी ताम्हिणी घाट परिसरात लपल्याची माहिती मिळाली. शोधमोहीम राबवताना पोलिसांना विनाक्रमांकाची संशयास्पद मोटार दिसली. पाठलाग करून पोलिसांनी विक्रांत ठाकूर आणि सुमीत पटेल यांना पकडले. गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि मोबाइल जप्त करण्यात आले.

मुख्य आरोपी अमित पठारे याला दिघी पोलिसांनी वाघोलीतून अटक केली. सुमीत पटेल हा गोळीबाराच्या आधी आणि नंतरही आरोपींसोबत राहिल्याचे समोर आल्याने त्यालाही गुन्ह्यात सामील करण्यात आले.

तापकीर यांचं नाव पुढे आल्यानं तपासाला नवं वळण खुनामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसले तरी आरोपींकडून चौकशीत किसन तापकीर यांचे नाव समोर आल्यानं तपासाची दिशा बदलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तापकीर यांचा या गुन्ह्यात आर्थिक, वैयक्तिक वाद किंवा अन्य प्रकारे सहभाग होता का, याची तपासणी सुरू आहे.

तापकीर यांचा शोध घेण्यासाठी दिघी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले असून, पुढील तपास गतीमान करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
वाळू तस्करीवर राज्य सरकारचा प्रहार; गुन्हा सिद्ध होताच वाहनाचा परवाना तात्काळ रद्द

वाळू तस्करीवर राज्य सरकारचा प्रहार; गुन्हा सिद्ध होताच वाहनाचा परवाना तात्काळ रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News