महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बोपखेल (पुणे) येथे झालेल्या १६ वर्षाखालील मुले व मुलींच्या पहिल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने अष्टपैलू कामगिरी केली हर्षदा सुभाष माळी (पाळधी ता. जामनेर) ह्या मुलीने या संघात उत्कृष्ट कामगिरी केली . हरियाणा राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे २७ ते ३० नोव्हेंबर रोजी सोनीपत येथे होणाऱ्या ३५ व्या सब ज्युनिअर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी या खेळाडूची निवड झाली. या निवडीबद्दल ह्या मुलीचे मार्गदर्शक उज्ज्वल जाधव,शिवाजी भोई,निलु जाधव, शुभम चौधरी,जय श्रीराम कबड्डी संघ पाळधी यांचे मार्गदर्शन लाभले





