जळगाव – उद्या म्हणजेच २ डिसेंबर रोजी राज्यासह जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीप्रमाणे न्यायालयात अपिल असलेल्या १२ प्रभागांतील निवडणुका लांबणीवर ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी रद्द केली गेली आहे. आता या प्रभागांमध्ये नवीन मतदान २० डिसेंबर आणि मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील निवडणूक ठिकाणे
जळगाव जिल्ह्यातील १६ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यात समाविष्ट आहेत:
नगरपरिषद: जामनेर, अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, वरणगाव, यावल नगरपंचायती: मुक्ताईनगर, शेंदुर्णी प्रशासनाने मतदान केंद्रांवर सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगितले आहे.
स्थगित झालेल्या १२ प्रभागांची माहिती
न्यायालयीन प्रकरणामुळे पुढील प्रभागांमध्ये नगरसेवक पदांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत:
अमळनेर: प्रभाग 1-A सावदा: प्रभाग 2-B, 4-B, 10-B यावल: प्रभाग 8-B वरणगाव: प्रभाग 10-A, 10-C पाचोरा: प्रभाग 11-A, 12-B भुसावळ: प्रभाग 5-B, 11-B या प्रभागांमध्ये २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार नाही.
सुधारित निवडणूक कार्यक्रम
जिल्हाधिकारी ४ डिसेंबरला सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. त्यानंतर उमेदवार नावनोंदणी अर्ज भरण्यास सुरुवात करेल. १० डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत असेल. ११ डिसेंबरला चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल.





