विवरा ता रावेर प्रतिनिधी – येथुन जवळच असलेल्या निंभोराबु ता: रावेर येथील वाघोदा रोड लागत असलेल्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत मुलींच्या शौचालयाचा लोखंडी दरवाजा चोरी झाल्याची घटना घडली. दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेच्या शौचालयाचा लोखंडी दरवाजा चोरीस नेला घटनेची माहिती शाळेच्या शिक्षिका नाजीमा परविन शेख महेमूद यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वप्रथम केंद्रप्रमुख व स्थानिक पालकांना व ग्रामपंचायत सदस्यांना सांगून घटनास्थळी बोलवून भेट दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य सायरा बि युनूस खान व सौ.शाहीन दस्तगीर खाटीक व मुतवली शरीफ रुस्तम खान यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून चोरीचा तपास सुरू केला आहे.
काही दिवसा अगोदर याच शाळेत दारूच्या खाली बाटल्या व विष्ठा अज्ञात माथेफिरूने केली असल्याची माहिती मिळाली वारंवारच्या अशा घटनांमुळे जि.प.शाळा शिक्षकांमध्ये नाराजीची भावना असून चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
पालकांची प्रतिक्रिया
# • फारुख शेख #•
शाळेत चोरी व नासधुस करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला गावातील विविध ठिकाणी लावलेल्या सी.सी.टीव्ही.त तपास करून चोरट्याला अद्दल घडवावी.





