जळगाव : जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी आज (२ डिसेंबर) सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या दोन तासांत जिल्ह्याचा मतदानाचा एकूण टक्का ६.१ इतका नोंदवण्यात आला आहे.
एकूण १६ नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींच्या ४५२ जागांसाठी मतदान होत असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदार मतदान करू शकतील. या प्रक्रियेसाठी जिल्ह्यात ९६७ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ८.८९ लाख मतदार जळगाव जिल्ह्यात एकूण ८,८९,९१४ मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदार : ४,५०,८९३, महिला मतदार : ४,३८,९३८, इतर मतदार : ८३ असा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दोन तासांत पुरुष आणि महिला मतदान पहिल्या दोन तासांत ३०,४७९ पुरुष, २२,४९५ महिला
यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यावल मध्ये सर्वाधिक, पाचोरा मध्ये सर्वात कमी मतदान पहिल्या दोन तासांच्या मतदानाच्या आकडेवारीनुसार यावल येथे सर्वाधिक १०.८७% मतदान झाले, तर पाचोरा येथे सर्वात कमी ३.६५% मतदानाची नोंद झाली.
तालुकानिहाय दोन तासांत झालेले मतदान (टक्केवारी)
जामनेर : 6.29%, भुसावळ : 5.12%, यावल : 10.87%, फैजपूर : 10.03%, पाचोरा : 3.65%, वरणगाव : 8.08%, अमळनेर : 5.59%, चाळीसगाव : 6.19%, सावदा : 5.08%, चोपडा : 5.47%, रावेर : 8.31%, भडगाव : 4.48%, धरणगाव : 6.50%, एरंडोल : 6.97%, पारोळा : 5.15%, नशिराबाद : 6.26%, मुक्ताईनगर : 5.20%, शेंदुर्णी : 6.69%





