पाळधी प्रतिनिधी : दिपक धनगर – खेडी बु., ता. व जि. जळगाव येथील मतिमंद युवक ज्ञानेश्वर सुभाष चंदनशिव (वय ३५ वर्षे) हा मागील २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता घराबाहेरून निघून गेला असून तो अद्याप परत आला नाही. युवकाचा रंग – सावळा, उंची – सुमारे ५ फूट अशी शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. हरवल्याची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे करण्यात आली आहे.
आज दिनांकापर्यंत २ महिने आणि ८ दिवस उलटूनही युवकाचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत.
हरवलेल्या युवकाचा भाऊ विविध ठिकाणी शोध घेत असून, त्यांचे वडील सुभाष वामन चंदनशिव हे परिस्थिती गरिबीची असूनही सायकलवरून पुणे, मालेगाव, नाशिक, वनगड तसेच अन्य परिसरात फिरून मुलाचा शोध घेत आहेत. दिवस-रात्र न थकता सुरू असलेल्या या शोधमोहीमेने सर्वांचीच मने हेलावली आहेत.
सध्या वडील पाळधी (ता. जामनेर) येथे मुक्कामी थांबले असून, “माझा मुलगा कुठेही दिसल्यास कळवा” अशी विनंती त्यांनी डोळ्यात अश्रू आणून केली आहे. समाजानेही मानवतेच्या नात्याने मदत करावी, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
संपर्क क्रमांक
हरवलेली व्यक्ती आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
-
शरद चंदनशिव (भाऊ): ७७७००८६३००
-
तुळशिराम चंदनशिव: ९४२०९४१९९०
-
सुभाष वामन चंदनशिव (वडील): ७७६८९५७०५१





