पाळधी – गावातील सुकन्या कु. हर्षदा सुभाष माळी हिने हरियाणामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत हर्षदाने आपल्या कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्राला तृतीय क्रमांक मिळवून दिला आहे.
हर्षदाच्या या उज्ज्वल यशाने पाळधी गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
हर्षदा, तुझे मनःपूर्वक अभिनंदन!
तुझे पुढील खेळजीवन यशस्वी व उज्ज्वल होवो, ही सदिच्छा!





