मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सोयीसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने व्यापक तयारी केली आहे. मुंबईबाहेरील प्रवाशांना चैत्यभूमी व राजगृह येथे सहज पोहोचता यावे यासाठी दादर आणि सीएसएमटीसाठी १५ विशेष मेल-एक्स्प्रेस गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी लोकल सेवा नेहमीच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
प्रवासी नियंत्रणासाठी मोठा पोलिस बंदोबस्त
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्याने मध्य रेल्वेने
५७० रेल्वे पोलिस (RPF/GRP)
३५० रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी व कर्मचारी
तैनात केले आहेत.
प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी १३५ टीसींची नियुक्ती करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानक परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली असून
७०० पोलिस व आरपीएफ कर्मचारी
१६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत देखरेख
असे नियोजन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेची १२ विशेष लोकल सेवा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे ५ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर मुख्य मार्गावर आणि हार्बर लाईनवर १२ विशेष लोकल चालवणार आहे. प्रवाशांनी या विशेष गाड्यांसाठी तिकीट घेऊन प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मुख्य मार्ग (अप – परळकडे)
कुर्ला – परळ : रात्री ११.४५
कल्याण – परळ : मध्यरात्री १.००
ठाणे – परळ : मध्यरात्री २.१०
मुख्य मार्ग (डाउन – परळहून)
परळ – ठाणे : मध्यरात्री १.१५
परळ – कल्याण : मध्यरात्रीनंतर २.३०
परळ – कुर्ला : मध्यरात्री ३.०५
हार्बर मार्ग (अप – कुर्ल्याकडे)
वाशी – कुर्ला : मध्यरात्री १.३०
पनवेल – कुर्ला : मध्यरात्री १.४०
वाशी – कुर्ला : मध्यरात्री ३.१०
हार्बर मार्ग (डाउन – कुर्लाहून)
कुर्ला – वाशी : मध्यरात्री २.३०
कुर्ला – पनवेल : मध्यरात्री ३.००
कुर्ला – वाशी : पहाटे ४.००





