दिनांक ०४ डिसेंबर २०२५ रोजी ज़िकरा इंग्लिश मिडीयम स्कूल, जामनेर येथे पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ज़िकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव शेख ज़ाकिर सर, न्यू ऊर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समीऊर्रहमान सर, तसेच ज़िकरा इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्रिन्सिपल शेख शादाब अहमद सर उपस्थित होते.
विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) – उल्लेखनीय यश
दिनांक २८, २९ व ३० ऑक्टोबर २०२५ रोजी विद्यार्थी विज्ञान मंथनची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जिल्ह्यातील इयत्ता ७वी, ८वी व ९वीच्या ८,००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
ज़िकरा इंग्लिश मिडीयम स्कूलमधील २० विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश मिळविले. त्यापैकी इयत्ता ९वीच्या
रमिज़ा वसीम पटेल
अदिफा अबूल आला शेख
रिमशा सदफ सैय्यद रऊफ
या तीन विद्यार्थिनींची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन – झळकला ज़िकराचा लौकिक दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी जामनेर येथील जीनियस इंटरनॅशनल स्कूलमध्ये ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विभागात ज़िकरा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करून तृतीय क्रमांक मिळविला.
प्राथमिक विभाग :
समी आसिफ देशमुख (इ. ८वी) – तृतीय क्रमांक
रमिज़ा वसीम पटेल – तृतीय क्रमांक
माध्यमिक विभाग :
कैस जाकिर खान – तृतीय क्रमांक
शुमायला शकिल शेख – तृतीय क्रमांक
या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके ज़िकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिव शेख ज़ाकिर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
शिक्षकांचा गौरव विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा तसेच विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल विज्ञान शिक्षक शेख नदीम सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.





