मुंबई – भारतात रेल्वे प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दरम्यान, बाबासाहेब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर) मुंबईकडे जाणाऱ्या अनुयायांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवर होत असते. ही परिस्थिती लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
10 रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती बंद
गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भुसावळ विभागाने खालील 10 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती थांबवली आहे:
जळगाव, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा,
ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरज असणाऱ्यांना सवलत
प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदीस सवलत देण्यात आली आहे.




