पाल (ता. रावेर) – गारखेडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ तब्बल १० फूट लांबीचा अजगर दिसून आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मागील दहा दिवसांपासून हा अजगर या परिसरात राहत असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला.
वनविभागाच्या पथकाने शोधमोहीम राबवून अखेर या अजगराचा सुरक्षितरीत्या रिस्क्यू करण्यात यश मिळवले.
वनकर्मचारी व सर्पमित्रांचा संयुक्त प्रयत्न अजगराला पकडण्याच्या मोहिमेत वनरक्षक शांतीनाथ बनगे, वनरक्षक मुकेश तडवी, वनमजूर सबाज तडवी, हुसेन तडवी, मुस्तफा तडवी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बारेला
सर्पमित्र शेख आवेश, सत्तार शेख, सोहेल शेख (रा. रसलपूर), या सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला.
२२ किलो वजनाचा अजगर सुरक्षित स्थळी सोडला
अजगराचे वजन २२ किलो असल्याचे वनविभागाने सांगितले. पकडल्यानंतर त्याला कोणतीही इजा न होता नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात आले.





