पाल (ता. रावेर) – येथील हजरत पिर फतेहशाह बाबा यात्रोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, यात्रेचे आयोजन तडवी मुस्लीम कमिटीमार्फत करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय उत्सव ७ ते ९ डिसेंबर दरम्यान साजरा होणार आहे. दर्गा परिसरात ७ डिसेंबरपासून समा मेहफिल, रंगारंग कार्यक्रम, संदल मिरवणूक व कव्वाली अशा विविध धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल राहणार आहे.
कव्वाल.. 1) नौशाद अली दिल्ली vs इंतजार चिशती कोल्हापूर 8 डिसेंबर
2025
2) मुराद आतिश बँगलोर vs लतिफ हैरा जळगाव 9 डिसेंबर 2025 यात्रा दरम्यान दि. ७ डिसेंबर संदल, ८ रोजी मुख्य यात्रा, तर ९ रोजी यात्रेचा समारोप होईल. नोकरी आणि कामानिमित्त अनेक ग्रामस्थ स्थलांतरित झाले असले तरी यात्रेनिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने गावात हजेरी लावतात. यात्रेच्या काळात पंचक्रोशीतील नातलग, मित्रपरिवार यांच्यात भेटीगाठी होत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण असते. संदल मिरवणुकीसाठी विविध ढोल-ताशे पथके, डीजे तसेच महागडी बँड पथके स्थानिक तरुणांनी बुक केली आहेत. कव्वालीचा मुख्य कार्यक्रम दर्गा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.





