प्रतिनिधी : शेख शफी लियाकत, जामनेर ग्रामीण – नाचणखेडा ग्रुप ग्रामपंचायतीत भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम श्रद्धेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली तसेच दोन मिनिटे मौन पाळून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या अभिवादन कार्यक्रमाला युवा नेते हर्षल चौधरी, सरपंच कैलास चौधरी, उपसरपंच श्रीकांत पाटिल, गट विकास अधिकारी अजय वंजारी, गावचे पोलीस पाटील बाळू भाऊ, माजी उपसरपंच आबेद पटेल, कलीम पटेल, मौलाना आसिफ पटेल, इकबाल देशमुख, प्रकाश मोरे, शफी मिस्तरी, रोजगार सेवक किरण पाटिल, किरण बाविस्कर, शुभम बाविस्कर, उमेश तायडे तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी विचारांचा आढावा घेत उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. ग्रामपंचायतीतून समाजात्मतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




