चोपडा तालुका प्रतिनिधी पृथ्वीराज सैंदाणे – दिनांक 06 डिसेंबर 2025, वार शनिवार, सकाळी 11:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास सूतगिरणी संचालक ॲड. एस. डी. पाटील, सूतगिरणी संचालक के. डी. चौधरी, माजी नगरसेवक विलास दारुंटे, प्रताप सोनवणे, रमाकांत सोनवणे, संजय बोरसे, एस. आर. पाटील, जयवंतराव पाटील, विजय पाटील, महेंद्र शिरसाट, देवकांत चौधरी, सुमित पाटील, अमोल पाटील, सुधाकर बाविस्कर, इलीयास पटेल तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले व समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.





