शहापूर ग्रामीण प्रतिनिधी सुनिल सुरवाडे – तालुक्यातील जामनेर – भुसावळ या मुख्य रस्त्यावरील गंगापुरी पुलापासून थोड्या अंतरावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ये- जा करणाऱ्या प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याला पाहून अनेकांना घाम फुटला. या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
गंगापुरी गावाजवळील पूल वाघुर बॅकवॉटर च्या पाण्याने वेढला गेलेला आहे. आजूबाजूला घनदाट जंगल असून या जंगलात बिबट्या, वाघ, हरिण, असे विविध प्राणी असल्याची चर्चा आहे. हे प्राणी
पाणी पिण्यासाठी पुला जवळ येत असतात. जनता बँक जामनेर शाखेत कार्यरत असलेले राजेंद्र सकदेव चौधरी हे भुसावळ येथे वास्तव्यास असून ते जामनेर भुसावळ दररोज मोटरसायकलने अपडाऊन करतात.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भुसावळ जात असताना त्यांना पुलाच्या पुढेच शंभर फुटाच्या अंतरावर बिबट्या दिसला. तिथेच त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला. ये-जा करणारे प्रवासी दोघ बाजूला थांबून गेले. राजेंद्र चौधरी यांनी मोटार सायकल घेऊन जात होते त्यांनी मोटार सायकल थांबवून लाईट तसेच एक्सीलेटर वाढवून घर घर करत बिबट्या तिथुन कुणावरही हल्ला न करता जंगलात निघून गेला. अशी माहिती राजेंद्र चौधरी यांनी दिली. वनविभागाने अशा प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.





