जळगाव- कुटुंबासह मूळ गावी पाटणा (बिहार) येथे गेलेल्या मनीषकुमार सिंग (३७, रा. देवेंद्रनगर) यांच्या बंद घराचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरल्याचा प्रकार २६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मनीषकुमार सिंग हे जळगावातील आयकर विभागात कार्यरत आहेत. ते २० नोव्हेंबर रोजी पत्नी व दोन मुलीसह पाटणा येथे गेले होते. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील दागिने लांबावले.
चोरट्यांनी ४ ग्रॅम टोंगल, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि १ ग्रॅमचे पेंडल असा मिळून ८ ग्रॅम वजनाचे सुमारे ४८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले.
२६ नोव्हेंबर रोजी सिंग यांचा मित्र झाडाला पाणी देण्यासाठी घरी गेला असता दरवाजा उघडा दिसून आला. संशय आल्याने आत पाहिले असता चोरीचा प्रकार उघड झाला. मित्राने तत्काळ सिंग यांना माहिती दिली.
८ डिसेंबर रोजी गावीून परतल्यानंतर मनीषकुमार सिंग यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोहेकॉ जितेंद्र राठोड पुढील तपास करीत आहेत.





