पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी अब्दुल्ला शेख – यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र चॅम्पियन कुमार गट कुस्ती स्पर्धेत पहूर गावचे सुफियान पैलवान व साई पैलवान यांनी राज्यस्तरीय अंतिम फेरीत (स्टेट लेव्हल फायनल) प्रवेश करून उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशामागे इका पैलवान, कलीम पैलवान, निजाम पैलवान, शरीफ पैलवान व अब्दुल्ला पैलवान या अनुभवी वस्तादांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे दोन्ही पैलवानांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या उल्लेखनीय यशाबद्दल पहूर गावात सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून आनंदाचे वातावरण आहे.
या प्रसंगी गावातील अनेक मान्यवरांनी दोन्ही पैलवानांचे अभिनंदन करून सत्कार केला. यामध्ये माजी जिल्हा परिषद कृषी सभापती आदरणीय श्री प्रदीप भाऊ लोढा, सेंट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य श्री रामेश्वर भाऊ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य श्री योगेश भाऊ भडांगे, ग्रामपंचायत सदस्य सलीम भाऊ मौला, इरफान भाऊ शेख, शेख चांद भाऊ तडवी, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना भाऊ पठाण, तजमल खान पठाण, अहमद भाऊ तडवी, तसेच मोईन पैलवान, गयास पैलवान, रईस पठाण, रियाज भाऊ शेख आणि सुप्रीम ट्रान्सपोर्टचे संचालक फिरोज भाई यांचा समावेश होता.
सर्व मान्यवरांनी दोन्ही पैलवानांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्याची कामना केली.





