यावल प्रतिनिधी फिरोज तडवी – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे. ज्याचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगार-भिमुख प्रशिक्षण देणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे. यात 12वी उत्तीर्ण तरुणांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा 6,000 ते 10,000 रुपयापर्यंत भत्ता मिळतो. मात्र 11 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही कायमस्वरुपी नोकरी न मिळाल्याने तरुण-तरुणी आक्रमक झाले आहेत. चार दिवस आंदोलन केल्यानंतर आज (13 डिसेंबर) तरुण-तरुणींनी अधिवेशनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून तरुण-तरुणींची धरपकड करण्यास सुरुवात झाली,
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून 11 महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही कायमस्वरुपी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे समग्र शिक्षा अभियान संघर्ष समितीच्या माध्यमातून 9 डिसेंबरपासून तरुण आणि तरुणींनी नागपुरात आंदोलनाला सुरुवात केली. मात्र प्रशासनाकडून कोणीही चर्चेला आले नाही. त्यातच रविवारी (14 डिसेंबर) हिवाळी अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे मागण्यासंदर्भात जीआर निघावा, यासाठी तरुण-तरुणी आक्रमक झाले आणि त्यांनी अधिवेशनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी गेटवरच त्यांना थांबवलं आणि काही जणांना ताब्यात घेतलं आहे.दरम्यान, सरकारने 11 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे युवा प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी आक्रमक झाले आणि चार दिवसांच्या आंदोलनानंतर आज सरकारविरोधात नागपूरात जोरदार मोर्चा काढण्यात आला. अधिवेशनाच्या दिशेने निघालेला हा मोर्चा पोलिसांनी विद्यार्थ्यांनी दिला आहे





